सांगोला (प्रतिनिधी):- एटीएम मधील पैसे काढण्याचे ज्ञान नसल्यामुळे अज्ञात इसमाने एटीएमची आदला बदल करुन 1 लाख 20 हजार 804 रुपये खात्यातून काढून ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची घटना सांगोला येथे घडली. हणमंत विष्णू जाधव (वय 68) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात गेलो असता सांगोला पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करत असल्याचे जाधव यांचेकडून सांगण्यात आले.
हणमंत विष्णू जाधव हे वासूद हद्दीमधील सूतगिरणी समोर कायम वास्तव्यास आहे. हणमंत जाधव हे दिनांक 19 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सांगोला शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथील बैंक ऑफ महाराष्ट्र येथील एटीएम मध्ये वैयक्तिक खात्यातील पैसे काढण्यास गेले होते. त्यांना एटीएम मधील पैसे काढण्याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या अनोळखी इसमास माझे बैंक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड दिले व पैसे काढण्यास सांगितले तेव्हा त्या अनोळखी इसमाने माझ्या खात्यातून 500 रुपये एवढी रक्कम काढून दिली व तेव्हाच हातचलाखीने त्या अनोळखी इसमाने त्याच्या जवळ असलेले एटीएम कार्ड बदलले व जाधव यांचे एटीएम कार्ड घेऊन पसार झाला.
तसेच त्या इसमाने दिलेले एटीएम कार्ड हे स्टेट बैंक ऑफ इंडिया येथील असल्यामुळे मी बँकेत माहिती घेतली असता सदरील एटीएम व बँकेचे खात्याचे नाव कुलदीप सोरंग मो.नं. 9059856460 व पत्ता: रंग विहार ता. कोरढुंग जि. तैसार झारखंड येथील आहे. तसेच सदरील इसमाने माझ्या खात्यातून दिनांक 19 जून 2025 ते 26 जून 2025 पर्यंत 01 लाख 20 हजार 804 एवढी रक्कम जाधव यांच्या खात्यातून सदरील इसमाने काढून घेतली आहे.
जाधव हे अज्ञानी व अशिक्षित असल्याने सदरील रक्कम काढत असताना कळत नसल्याने जाधव जेंव्हा दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी बँकेत गेले असता झालेला प्रकार उघडकीस आला व ज्ञात झाला असल्याचे तक्रारी अर्जात नमूद केले आहे.