टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ashok Kharat Case Nashik Sessions Court मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अशोक खरातच्या सुनावणीत न्यायालयात काय काय घडलं? (Ashok Kharat Case Nashik Crime News)

  1. न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात केलं
  2. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कोर्टरूममध्ये दाखल
  3. सरकारी वकील शैलेंद्र बागडे हजर झाले आहेत.
  4. सरकारी वकीलांच्या युक्तीवादाला सुरूवात
  5. न्यायाधीश त्याच्या स्टाफ कडून कागदपत्रे तपासले.
  6. तपास अधिकारी कोण माहिती घेतली
  7. अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
  8. उद्या पुन्हा त्याला कोर्टात हजर करणार…दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केले.
  9. 5 मिनिटात अशोक खरात कोर्टरुममधून बाहेर निघाला
  10. आज कोणताही युक्तिवाद झाला नाही.
  11. 5 मिनिटात न्यायालयाने निर्णय दिला.

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now