सांगोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष अतुल (मालक) पवार व अतुल पवार मित्र परिवार, सांगोला’ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कु. आराध्या अतुल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवार दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.00 वा. बंधन पॅलेस, वाढेगाव रोड, सांगोला येथे संपन्न होणार आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात मनी मंगलसूत्र, चांदीचे पैजन व जोडवी, संसारोपयोगी भांड्यांचा सेट, नववधूसाठी साडी, वरासाठी शर्ट-पॅन्ट तसेच विवाह मंडप, पुष्पहार व पुष्पगुच्छ व मोफत विवाह नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सामूहिक विवाहासाठी नाव नोंदणी करणार्या जोडप्यांसाठी वधू-वर दोघांचेही वय (18 वर्षांपेक्षा जास्त वधू व 21 वर्षांपेक्षा जास्त वर) असल्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, दोघांचे आधारकार्ड, वधू वराच्या आई वडीलांचा रहिवाशी दाखला, वधू वरांचे सक्षम अधिकार्यांकडून प्राप्त झालेले जातीचे दाखले आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे
संबंधित बातम्या
नाव नोंदणीची अंतिम तारीख रविवार, दि.25 जानेवारी पर्यंत अशी असणार असून अधिक माहितीसाठी श्री. प्रविण नवले (मो.9096251901), श्री. तानाजी गंगथडे (मो.7875505028), श्री.कुणाल माने (मो.8453095555)व श्री. महेश पवार (मो.8530434912)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामुदायिक विवाह उपक्रमातून समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य, प्रेम व परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या कार्यक्रमामागील हेतू असल्याचे संयोजक अतुल (मालक) पवार यांनी सांगितले.




