महूद येथील अखंड हरिनाम सप्ताहाची रक्तदान शिबिराने सांगता

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
महूद, ता. १ : महूद (ता.सांगोला) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता नुकतीच महाप्रसाद व रक्तदान शिबिराने करण्यात आली.
युवकमित्र बंडातात्या महाराज कराडकर यांच्या प्रेरणेतून महूद ग्रामस्थ आणि व्यसनमुक्त युवक संघ शाखा महूद यांच्या वतीने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर संपन्न झाला.ज्ञानेश्वर हेटकळे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ चालक म्हणून सुदाम महाराज मतकर(आळंदी) यांनी काम पाहिले.
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सुदाम महाराज मतकर(आळंदी), हरे कृष्ण मंदिराचे तुकाराम प्रभुजी (महूद), उषा महामुनी (महूद), सयाजी महाराज गेंड (नरळेवाडी), सुवर्णा गळवे(खिलारवाडी), माणिक महाराज पाटील (महूद) यांची प्रवचने तर संत तुकाराम महाराजांचे वंशज सोहम महाराज देहूकर, संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज किरण महाराज बोधले, मच्छिंद्र महाराज कावडे (पळशी), शिवाजी गेळे (धायटी), भीमराव महाराज येडगे (महूद), सुरेश महाराज सुळ (अकलूज), संस्कार महाराज खंडागळे (संगेवाडी) यांची कीर्तने झाली.
या सप्ताहाच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळा व ग्राम प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला.गुरुवर्य युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थित भाविकांच्या वतीने येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक भाविक पुरुष व महिलांनी रक्तदान केले.

कहाणी लोकसहभागातून जल विकासाची

डॉ.सोमिनाथ घोळवे लिखित ‘कासाळगंगा : कहाणी लोकसहभागातून जलविकास’पुस्तकाची प्रत बंडातात्या महाराज कराडकर यांना यावेळी निवृत्त कृषी अधिकारी शशिकांत महामुनी, निवृत्त अभियंता संजय धोकटे आणि अभियंता अनिकेत महाजन यांच्या हस्ते भेट देण्यात आली. बंडातात्या महाराज कराडकर यांनी महूद येथील या कामाचे यावेळी कौतुक केले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon