टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ajit Pawar Plane Crash : गूढ वाढले, VSR कंपनीच्या मालकाच्या चौकशीत काय घडलं? रोहित पवारांनी सर्वच सांगितल

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला मिळालेल्या ‘व्हीआयपी’ वागणुकीवर आमदार रोहित पवार यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

Ajit Pawar Plane Crash : गूढ वाढले, VSR कंपनीच्या मालकाच्या चौकशीत काय घडलं? रोहित पवारांनी सर्वच सांगितल

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानतंर सातत्याने त्यांच्या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या कुटुंबियांकडून सातत्याने या विमान अपघाताची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. त्यातच काल VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग यांची सीआयडी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. आता यावरुन आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी VSR कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा अंत झाला, त्या कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. जय पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला आहे. या गंभीर निष्काळजीपणावर जय पवार यांनी संताप व्यक्त केला होता. या प्रकरणानंतर व्ही. के. सिंग यांची सीआयडी चौकशी करण्यात आली. काल त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आता या प्रकरणानंतर रोहित पवारांनी टीका केली.

रोहित पवार काय म्हणाले?

अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही.

एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

 

दरम्यान या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आता चौकशीच्या पारदर्शकतेवरच संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाचे सत्य समोर यावे यासाठी कुटुंबिय आणि समर्थकांचा लढा तीव्र होत असताना, सरकार आणि तपास यंत्रणा या टीकेला कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now