राजकीय व्यवस्थेने तापवलेले वातावरण थंड करण्यासाठीच एअर कंडिशनर- विश्वेश झपके

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांनी प्रचारात गती घेतली असून कालच त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मला एअर कंडीशनर चिन्ह मिळाले आहे. त्या चिन्हाच्या प्रतिकृतीचा प्रचार सध्या जोमाने सुरू आहे. मी प्रत्येक प्रभागात घरोघरी पोहोचलो आहे. लोकांपर्यंत पोहोचलो आहे. मी पुढील काळात जे काम करणार
आहे याबद्दलचा विश्वास लोकांपर्यंत पोहोचला आहे. सध्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात चुकीच्या पद्धतीने राजकीय वातावरण तापले आहे, ते वातावरण विकासाच्या पूर्ततेने थंड करण्यासाठी एअर कंडिशनर या चिन्हाद्वारे मी निवडून येणारच असा विश्वास नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांनी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवला.

यावेळी माध्यमाशी बोलताना 25 वर्ष नगरसेवक पद भूषवलेले सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की इतर वेळी झालेल्या निवडणुकीची तुलना आता होणार्‍या निवडणुकीशी केली तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घरापर्यंत पोहोचतोय,आपली भूमिका मांडतोय हे सांगोल्यात पहिल्यांदाच होत आहे., त्यामुळे एक शिक्षित उमेदवाराबद्दल सांगोला नगरीतील लोकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. वाड्या-वस्त्यांवरती जाताना तिथल्या समस्या,अडचणी प्रत्यक्षपणे समजल्या, सांगोल्याच्या पूर्व भागात रस्त्याच्या प्रचंड अडचणी आहेत, त्याचबरोबर भूमिगत गटारी योजना ही निधी अभावी अर्धवट राहिली आहे.

सांगोला शहरात धुळीचे साम्राज्य माजले आहे. विकासाची कामे कागदावरतीच दिसत आहेत. पूर्णत्वास आली नाहीत. त्यामुळे एक शिक्षित तरुण उमेदवार तुमच्यासमोर नगराध्यक्ष पदासाठी असणार आहे.दोन बलाढ्य शक्ती समोर सामान्य नागरिकांच्या मनातील उमेदवारालाच लोकांची पसंती असणार आहे.सर्व तालुक्यातील जनतेला माहित आहे आम्ही ज्या संस्था चालवतो त्या संस्थांमधील कारभार अतिशय पारदर्शक व आदर्श आहे. असाच कारभार सांगोला नगर परिषदेमध्ये सुद्धा होईल यात शंका नाही. सांगोला नगरवासी यांच्या अत्यंत मूलभूत गरजांसाठी व आधुनिक सोयी सुविधांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येणार्‍या दोन तारखेला निश्चितपणे अनुक्रमांक 4 एअर कंडीशनर या चिन्हासमोरील बटन दाबून सामान्य जनताच त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास सामान्य नागरिकांच्या वतीने मी व्यक्त करतो.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके सांगोल्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहचत आहेत.प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेत त्यावरील उपाय योजनेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान, हरित उपक्रम ,स्मार्ट व्यवस्थापन,नागरिकांसाठी तंत्रज्ञानाधारित सेवा देण्याचा त्यांचा विचार हा आधुनिकतेकडे नेणारा व लोकाभिमुख असल्यामुळे प्रत्येकाला खूप भावला आहे…

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon