संजय काकांसाठी आदित्य ठाकरेंची खास पोस्ट, आता राऊतांनी एका वाक्यातच दिलं उत्तर; म्हणाले…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Aaditya Thackeray on Sanjay Raut: आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे, असं म्हटलं होतं.

Aaditya Thackeray on Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मिडीया ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेकांनी “काळजी घ्या” अशा शुभेच्छा संदेशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या त्यांच्या पोस्टनंतर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील संजय राऊत यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. त्यावर राऊतांनी उत्तर दिलं आहे.

Aaditya Thackeray on Sanjay Raut: आदित्य ठाकरे यांच्या भावनिक संदेशावर राऊत म्हणाले…

आता आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर संजय राऊत यांनी धन्यवाद  my dear Aaditya अशी पोस्ट लिहली आहे.

 

Sanjay Raut: माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड

राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती, जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,” असे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut: अनेक नेत्यांनी व्यक्त केली काळजी

संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीसह महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी त्वरित प्रकृतीसुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

संजय राऊत नेहमीच राणे कुटुंबावर टीका करताना दिसतात, तर नितेश राणे यांनी देखील अनेकदा राऊत यांच्यावर तीव्र भाषेत टीका केली आहे. मात्र, राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच नितेश राणे यांनी तत्काळ काळजी व्यक्त केली. एक्सवर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “संजय राऊतजी… काळजी घ्या, लवकर बरे व्हा!”  असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केलीय.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील पोस्ट करत म्हटलंय, संजय राऊत जी, आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना.आपण उत्तम स्वास्थ्यासह लवकरच सक्रिय व्हाल याची खात्री आहे!

शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी देखील पोस्ट करत ‘संजय राऊत साहेब, आराम करा, लवकर बरे व्हा!  कारण, “शरीरं आद्यं खलु धर्म साधनं!!’, असं म्हटलं आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon