Accident News: टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेली क्रूझर गाडी थेट दुसऱ्या लेनवर गेल्याने हा भीषण अपघात घडला.
1/12

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला.
2/12

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात क्रूझर गाडी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
3/12

टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेली क्रूझर गाडी थेट दुसऱ्या लेनवर गेल्याने हा भीषण अपघात घडला.
4/12

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
5/12

एक क्रूझर गाडी कामगारांना घेऊन जात असताना लोणी देवकर एमआयडीसीच्या हद्दीत अचानक गाडीचा टायर फुटला.
6/12

टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ही गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली.
7/12

दोन्ही गाड्यांची समोरासमोर झालेली धडक इतकी जोरदार होती की, क्रूझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
8/12

या भीषण धडकेत गाडीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
9/12

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
10/12

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
11/12

मृतांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
12/12

सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







