Accident News: शिवनेरी-ओझर-लेण्याद्री सहलीदरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली आहे.
1/9

कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर ओतूर परिसरात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला.
2/9

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुमारे १० ते १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
3/9

आहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी येत होते.
4/9

दरम्यान, ओतूरजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली.
5/9

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
6/9

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
7/9

या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
8/9
आहिल्यानगर जिल्ह्यातुन जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ,ओझर,लेण्याद्री परिसरात सहल येत होती यावेळी ओतुर जवळ चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हाईडरला धडक लागुन अपघात झाला. ,ओझर,लेण्याद्री परिसरात सहल येत होती यावेळी ओतुर जवळ चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हाईडरला धडक लागुन अपघात झाला.

आहिल्यानगर जिल्ह्यातुन जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ,ओझर,लेण्याद्री परिसरात सहल येत होती यावेळी ओतुर जवळ चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हाईडरला धडक लागुन अपघात झाला.
9/9

या अपघातात एसटी बस पलटी झाली असुन स्थानिक नागरिकांच्या मदतीने विद्यार्थींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.











