टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठा दावा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही…

Follow Us:

अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक मोठी दावे केली जात आहेत. त्यामध्येच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलगीकरणाबद्दल बोलले जात आहे. त्यामध्येच आता राज्यातील एका बड्या नेत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव घेत दावा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. बारामती विमानतळाच्या अगदी लगत हा अपघात झाला. विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, एकही व्यक्ती या अपघातातून वाचू शकली नाही. अनेकांनी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशयही व्यक्त केला. विमान कोसळण्याच्या काही सेकंद अगोदर नेमके काय घडले हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट झाले. अजित पवार यांचे विमान आकाशातच एका बाजूला झुकल्याचे स्पष्ट दिसले. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अवघ्या काही तासात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी घाई केल्याचे अनेकांनी म्हटले. कारण सुनेत्रा पवार यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत स्पष्ट सांगितले की, मला या शपथविधीबद्दल काहीच माहिती नाही किंवा सुनेत्रा पवार शपथ घेणार की नाही हे पण माहिती नाही. सुनेत्रा पवार यांनी याबद्दल कोणतीही चर्चा केली नाही. यादरम्यान शरद पवार यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते, त्याबद्दलची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती.

पण आता यात खंड पडला. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याला नकार दिला. असे काही असते तर अजित पवार यांनी आमच्यासोबत चर्चा केली असती असे थेट अनेकांनी म्हटले, त्यामध्येच आता अजून एका राज्यातील मोठ्या नेत्याने थेट दावा केला.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होती आणि याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला होता, असा थेट दावा केला. हेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्याने म्हटले की, सुप्रिया सुळे केंद्रात, अजित पवार राज्यात आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे यांची निवड केली जाणार होती, असाही दावा करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य