दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

मुंबईत लोकलने 4 प्रवाशांना उडवले: तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर, सँडहर्स्ट रोड स्टेशनवरवरील दुर्घटना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन: ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा पाऊण तास ठप्प, चाकरमान्यांना फटका

पार्थ पवार कंपनी जमीन व्यवहार प्रकरण: अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा – अंजली दमानिया

पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 64.46% मतदान: बेगुसरायमध्ये सर्वाधिक 67.32%, शेखपुरा येथे सर्वात कमी 52.36% मतदान

अजित पवारांना भसम्या आजार झालाय: कितीही खाल्ले तरी त्यांना आणखी खावेसे वाटते, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांवर संतापले: निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद सोडण्याचा इशारा; म्हणाले- आकडे नकोत, काम दाखवा

राहुल यांनी दाखवलेली ब्राझिलियन मॉडेल समोर आली: म्हणाली, “काय वेडेपणा, मी भारतात गेलेली नाही.” दावा- 10 बूथवर 22 वेळा मतदान

पार्थ पवारांच्या कंपनीकडून 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी वादाच्या भोवऱ्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, तहसीलदारांसह दुय्यम निबंधकांचं निलंबन

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही,मी व्यवहार केलेला नाही, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पहिली प्रतिक्रिया

 पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन घोटाळाप्रकरणाशी माझा संबंध नाही, प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार,मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी, अजित पवारांचं स्पष्टीकरण

माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही, आत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवारांचा बचाव, राज्य सरकारवर हल्लाबोल 

आधी मिंदेंच्या लोकांच्या मुलांची प्रकरणं बाहेर आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं, चौकशी करतील पण काही होणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी 

देवेंद्र फडणवीस घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस 

उद्धव ठाकरे यांच्याकडून आचारसंहितेचा भंग करत मराठवाड्याचा दौरा, भाजप आमदार संजय केनेकरांची निवडणूक आयोगात तक्रार

इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका;राज ठाकरेंचा पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या

आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंना धक्का बसण्याची शक्यता ; मुंडेंचे निकटवर्तीय माजी आमदार भीमराव धोंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचा घणाघात

आमच्या कीर्तनकारांबाबत टीका करू नका, इतर धर्मात देखील मोठी लग्न आणि कार्यक्रम होतात, इंदुरीकर महाराजांच्या बचासावासाठी नितेश राणे मैदानात

महाराष्ट्राला थंडीची चाहूल, मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, तापमान दोन ते चार अंशानं घसरणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

धोनी 2026 मध्ये IPL खेळणार: चेन्नईचे CEO म्हणाले- यावेळी निवृत्त होणार नाही; संघाला पाच ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत

मोदींनी घेतली विश्वविजेत्या खेळाडूंची भेट: हरलीनने विचारले तेजस्वी चेहऱ्याचे रहस्य; PMनी दीप्तीला विचारले- हनुमानजींचा टॅटू का बनवला

अहमदाबादेत होऊ शकतो टी-20 वर्ल्डकप फायनल: पाकिस्तान पोहोचला तर सामना तटस्थ ठिकाणी होईल; वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल

भारताचा चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय, वॉशिंग्टन सुंदरची दमदार कामगिरी; टीम इंडियाची मालिकेत 2-1 ने आघाडी

आगामी टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर,मुंबईसह 5 शहरात रंगणार टी-20 वर्ल्डकप 2026 चा ‘महासंग्राम’

ईडीचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवनला मोठा धक्का, 11.14 कोटीची संपत्ती जप्त, बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करणं भोवलं

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon