दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 2 नोव्हेंबर 2025 | रविवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • महिला वर्ल्डकप फायनल- भारताने दिले 299 धावांचे आव्हान: शेफाली वर्माच्या 87, दीप्ती शर्माच्या 58 धावा, दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने घेतल्या 3 विकेट

  • शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या असे अजित पवारांना वाटते का?: प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल, म्हणाले – शेतकऱ्यांना भीक नको, त्यांचा हक्क हवा

  • कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, नांदेडचे रामराव अन् सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी, पहिल्यांदाच दोन शाळकरी मुलांचा पूजेत सहभाग

  • कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर, पवित्र स्नानाचा घेतला आनंद

  • प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली: ‘आम्ही मॅनेज झालो’ असे म्हणतात, शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार

  • महायुतीच्या एक वर्षाच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचा सरकारला घरचा आहेर, भाजप नेते कधीही पलटी मारतील, आमदाराचा टोला

  • महायुतीत भाजपसाठी इतर दोन पक्षांची गरज संपली: कुबड्या चुलीत घातल्या जातील, रोहित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर खोचक टीका

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आक्रमक: मराठवाड्यातून सरकारला घेरण्याची तयारी; चार दिवसांचा दौरा, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार

  • ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल: बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई, राजकारण तापणार

  • गुवाहाटीमध्ये आमदाराने जेवण सोडले, हॉटेलवरून उडी मारणार होते: बंडखोरीवेळचा किस्सा सांगत संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

  • भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांच्या नावाची घोषणा

  • आम्हाला लॉलीपॉप देताय, ‘दादरचा कबुतरखाना मरते दम तक हम खोलके रहेंगे’, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भूमिका

  • यंदा नोव्हेंबर महिन्यातही पावसाचे सावट, राज्यासह देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, थंडी लांबणीवर, हवामान खात्याचा अंदाज

  • पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात, कारचा हँडब्रेक ओढल्याने क्षणार्धात नियंत्रण सुटलं अन् दोघा भावांचा भयानक अंत, धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ आला समोर

  • अजित पवारांची विजयी घोडदौड कायम: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर, 22 पेक्षा जास्त संघटनांनी दिला पाठिंबा

  • शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’चे टायटल रिव्हील: बादशाह एका नवीन अवतारात, नवीन सिल्व्हर हेअर लूक, कानातले आणि स्टायलिश स्टाईल

  • सलमानला ऑफर झाला होता ‘चक दे ​​इंडिया’: दिग्दर्शक विवेक शर्मा म्हणाले- शाहरुखला स्क्रिप्ट आवडली, आदित्य चोप्राला अर्ध्या मानधनात काम करेल म्हटले

  • केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती: कसोटी आणि एकदिवसीय खेळत राहणार; म्हणाला- पूर्ण लक्ष कसोटी क्रिकेट आणि कुटुंबावर

  • तिसरा टी20 सामना: भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी विजय: मालिका 1-1 ने बरोबरीत; सुंदरने 49 धावा केल्या; अर्शदीपने घेतल्या 3 विकेट्स

  • बाबरने विराटला मागे टाकले: टी20 मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला; पाकने द. आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon