दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होणार, 21 दिवसात प्रक्रिया पार पडणार

  2. सत्याचा मोर्चा विरोधाचा नव्हे, जागृतीचा-जबाबदारीचा आवाज: शरद पवारांकडून ऐतिहासिक संदर्भ देत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी तुलना

  3. सत्याचा मोर्चा: आपला पक्ष, नाव आणि निशाणी चोरली गेली, आता मतचोरी सुरू; आता या ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल – उद्धव ठाकरे

  4. मतदार यादीतील त्रुटींविरोधातील मविआ अन् मनसेचा सत्याचा मोर्चा संपन्न, मुंबईच्या मलबार हिलमध्ये डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, मुरबाडच्या 4500 मतदारांचं मतदान, दुबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा, राज ठाकरे यांचं आवाहन

  5. आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू: मृतांमध्ये बहुतांश महिला, एकादशीला जास्त गर्दीमुळे रेलिंग कोसळली

  6. काळजी घे संजय काका!: संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस अन् जिंकतोस, आत्ताही तेच होईल; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट

  7. GST नोंदणी 3 दिवसांत उपलब्ध होईल: मासिक कर उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्यांना फायदा; ऑक्टोबरमध्ये ₹1.96 लाख कोटी GST कलेक्शन

  8. अखिलेश यादव म्हणाले- नितीश कुमार निवडणुकीपुरते ‘नवरदेव’: महाराष्ट्राप्रमाणेच खेळी होणार, शिंदेंच्या नावावर निवडणुका अन् फडणवीस मुख्यमंत्री झाले

  9. वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाही: सरकारची कर्जमाफी बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा पोस्ट डेटेड चेक, विरोधकांचा हल्ला

  10. हा सत्याचा मोर्चा नव्हे अपयशाचा कबुली मोर्चा: भाजपचा काँग्रेस अन् शरद पवारांसह ठाकरे बंधूंवर हल्लाबोल; विचारले तीन कळीचे प्रश्न

  11. माझ्यासकट कुटुंबीयांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा सक्षम ॲपचा उल्लेख करत गंभीर आरोप

  12.  मविआच्या सत्याचा मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर, सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप

  13. दुबार मतदार आजपासून नाही तर 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय दुबार मतदार कमी होणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य

  14. उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, प्रशासनानं तोडगा काढावा अन्यथा 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा

  15.  तळकोकणात पावसाचा जोर कायम,  मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या यात्रेला वारकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

  16.  आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू

  17.  केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; 64006 कुटुंबांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलं,मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची विधानसभेत घोषणा

  18.  पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकले, कोंढव्यात रिक्षा चालक गणेश काळेला भरदिवसा कोयत्याने संपवलं

  19. नाशिकमध्ये बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाख उकळले, भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा

  20.  पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक, आमच्या गंगावेश तालमीची अन् लाल मातीची अब्रू घालवली, वस्ताद हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांची तीव्र नाराजी

  21. हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरचे वडील रशीद शेख यांचा खळबळजनक दावा

  22. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी आमने सामने येणार, अंतिम सामन्याच्या लढतीवर पावसाचं सावट

  23. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 तून जोश हेझलवूड बाहेर,नवख्या माहली बीअर्डमॅनला संधी

  24. राहुल द्रविड म्हणाले- सिद्धू मूसेवाला-शुभ माझे आवडते गायक: पंजाबी गाण्यांमध्ये खूप सुधारणा झाली, अर्शदीपकडे सर्वात छान संगीत

  25. रोहन बोपण्णा व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त: गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले; 20 वर्षांची होती कारकीर्द

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon