सांगोला (प्रतिनिधी ) – श्रीराम प्रतिष्ठान सांगोला व सकल हिंदू समाज सांगोला तालुका आयोजित श्रीरामनवमी निमित्त आज सांगोला येथे भव्य शोभायात्रा निघणार आहे.
या शोभायात्रेचे खास आकर्षण मर्यादा पुरषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांची सुबक अशी मूर्ती असून ही शोभयात्रा दुपारी ठीक 4:00 वाजता निघणार आहे. या शोभयात्रेची सुरुवात वाढेगाव नाका येथून मार्गस्थ होणार आहे.
तरी या शोभायात्रेस सांगोला तालुका व शहरातील सर्व श्रीराम भक्तांनी व हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.