सांगोला येथे वाहनाच्या धडकेत वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
सांगोला :- हयगयीने अविचाराने निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवुन मोकळ्या जागेत बसलेले वारकर्‍यास जोराची धडक दिल्याने वारकर्‍याचा गंभीर रित्या जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला येथील जयनिला हॉटेल शेजारी असणारे माऊली हॉटेल मिरज सांगोला रोडवर 06 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.45 वाजणेचे सुमारास घडली. अपघातामध्ये बंडु जाधव (वय 65 वर्षे रा.करडयाळ ता.कागल ,जि.कोल्हापुर) या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची फिर्याद राजेंद्र जाधव (रा.करड्याळ ता.कागल, जि. कोल्हापुर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता चैत्रवारी निमित्त पंढरपुर येथे करड्याळ गावातील श्री.विठ्ठल रखुमाई पायी दिंडी भक्त मंडळ, करड्याळ गणेशवाडी असे संयोजकाने आयोजित केलेल्या पायी दिडींतुन फिर्यादी मी पत्नी व चुलते बंडु जाधव असे मिळुन गावातील एकुण 36 लोक पायी निघाले होते. ठरले प्रमाणे मुक्काम करत करत काल रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.45 वाजणेचे सुमारास सांगोला येथील जयनिला हॉटेल शेजारी असणारे माऊली हॉटेल मिरज सांगोला रोड च्या बाजुला वारकरी चहा पाण्यासाठी थांबले असताना त्यावेळी दिंडीतील बंडु जाधव, फिर्यादी स्वतः व इतर वारकरी लोक चहा पिवुन रोडच्या डाव्या बाजुला असलेला हॉटेलच्या बाजुला असलेल्या मोकळया जागेत बसले होतो. त्यावेळी अचानक एका भरधाव पांढर्‍या रंगाच्या कार गाडीने रोडच्या साईडपटटीवर येवुन दिंडीतील वारकरी बंडू गोपाळ जाधव यांना धडक देवुन गाडी न थांबता पुढे निघुन गेली.
त्यानंतर फिर्यादी स्वतः व सोबत वारकरी रमेश वाणी, आनंदा जाधव, शिवाजी जाधव यांनी मिळुन हॉटेल मालकाने दिलेल्या वाहनातुन बंडु जाधव यांना उपचार करिता सांगोला येथील ग्रामीण रूग्णालय मध्ये घेवुन आलो. तेथील डॉक्टरांनी बंडु जाधव यांना तपासुन ते उपचारपुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले त्यानंतर फिर्यादी यांना सांगोला पोलीस स्टेशन मध्ये बोलाविण्यात आले व बंडु जाधव यांना धडक देणारे वाहन दाखविण्यात आले.ती कारगाडी फिर्यादी यांनी ओळखली अ असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Children’s Health : मुलांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? मग दुधासोबत या पदार्थांचा करा समावेश!

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon