Solapur Crime News: 23 जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी हे दोघे येरमाळा येथे आले होते. त्यानंतर 28 जानेवारी रोजी घरातील सदस्यांसह सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश हे जेवणासाठी पांगरीतील एका हॉटेलमध्ये गेले होते.

सोलापूर: बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध करीत मेहुण्याने भाऊजीच्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मेहुण्याने काचेची बाटली फोडून गळ्यावर वार केल्याने भाऊजीचा मृत्यू (Solapur Crime News) झाला आहे. 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत सुशील क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या भाऊजीचं नाव असून, ऋषिकेश क्षीरसागर असं आरोपी मेव्हण्याचं (Solapur Crime News) नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेशची बहीण रेश्मा यांचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र घरातील काही सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता. सुशील आणि रेश्मा हे कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते.(Solapur Crime News)
23 जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी हे दोघे येरमाळा येथे आले होते. त्यानंतर 28 जानेवारी रोजी घरातील सदस्यांसह सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश हे जेवणासाठी पांगरीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी सुशील आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर ऋषिकेशने सुशीलने दारूची बाटली फोडून सुशिलवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तातडीने पांगरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पांगरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पांगरी पोलीस करत आहेत.(Solapur Crime News)
नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधातून झालेल्या बहिणीच्या लग्नाचा राग भावाच्या मनात होता, तोच राग धरून बहिणीला व तिच्या पतीला (मेहुणे) पांगरी (ता. बार्शी) गावाजवळील हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं. तिथे झालेल्या बाचाबाचीतून बाटली फोडून मेहुण्याच्या गळ्यावर वार करून त्याचा निघृण खून केल्याची घटना बुधवारी 28 जानेवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी पांगरी पोलिसांनी ऋषीकेश मरिबा क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुशील दिलीप क्षीरसागर (रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशील व रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, या विवाहाला रेश्माच्या कुटुंबीयांचा विरोध होता. ते दोघे पुण्यात वास्तव्यास होते.(Solapur Crime News)
संबंधित बातम्या





