Dhurandhar: ‘बॉर्डर 2’च्या लाटेतही ‘धुरंधर’ने रचला इतिहास; कामगिरी अशी की तुम्हीही म्हणाला वाह!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सध्या बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा धुमाकूळ सुरू आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. एकीकडे ‘बॉर्डर 2’ची लाट असतानाही रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने इतिहास रचला आहे.

Dhurandhar: 'बॉर्डर 2'च्या लाटेतही 'धुरंधर'ने रचला इतिहास; कामगिरी अशी की तुम्हीही म्हणाला वाह!

सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावर ‘बॉर्डर 2’चीच चर्चा पहायला मिळतेय. सनी देओलच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला तगडी कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ची लाट असताना या लाटेत दुसरे चित्रपट वाहून जातील अशी अपेक्षा होती. परंतु रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा दगड पार करत बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास रचला आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार, एकीकडे हा चित्रपट येत्या शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचा तब्बल 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शनाच्या 53 दिवसांत ‘धुरंधर’ने ही कामगिरी केली आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर’ने आठव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. तरीसुद्धा वीकेंडला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’कडून तगडी टक्कर मिळत असतानाही ‘धुरंधर’ या वादळात चांगला टिकून आहे. ‘बॉर्डर 2’ने पहिल्या वीकेंडपर्यंत 177 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता ‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त हिंदी भाषेतून 1000 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’, ‘केजीएफ: चाप्टर 2’ आणि ‘पुष्पा 2: द रुल’ यांसारख्या चित्रपटांच्या नावे हा विक्रम होता, परंतु हे चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाले होते.

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ने 1000 कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता निर्माते त्याच्या डिजिटल रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या जवळपास पावणे दोन महिन्यांनंतर हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. तर ‘धुरंधर’चा सीक्वेल 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ असं या सीक्वेलचं नाव आहे. विविध प्लॅटफॉर्मसाठी त्याचे दोन ते तीन टीझर निर्मात्यांनी तयार केले असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या टीझरसाठी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र घेण्यात आले आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon