जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने मंगळवारी होणार्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
सांगोला (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मंगळवार दि 16 डिसेंबर रोजी दु. 12 वा. शहरातील आनंद लॉन्स येथे ही बैठक संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील आणि मधुकर बनसोडे यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या संबंधित विचार विनिमय करणे तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करणे आणि सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. सांगोला तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतीच्या पाण्याबाबत तसेच दूध उत्पादक शेतकर्यांना न मिळालेल्या वाढीव अनुदानाची रक्कम मिळावी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरित भरपाई मिळावी, टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलाव तर नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून चिंचोली तलाव वर्षातून किमान दोन वेळा भरून द्यावा यांसह टेंभू योजना म्हैसाळ योजना नीरा उजवा कालवा योजना पूर्णपणे कार्यान्वित करून सांगोला तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळावे तालुक्यातील माण कोरडा आणि आफ्रुका नदीवर असणार्या सर्व बंधार्यांची गळती रोखून त्यांची दुरुस्ती व्हावी यासह सांगोला शहर आणि तालुक्यातील शेतकर्यांच्या असणार्या विजेबाबत असणार्या समस्या जाणून त्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
तरी सांगोला शहर व तालुक्यातील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर प्रेम करणार्या तमाम कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित यावे, असे आवाहन जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील आणि मधुकर बनसोडे यांनी केले आहे
संबंधित बातम्या




