नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची 100 टक्के उपस्थिती
सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, सातत्य आणि सभागृहातील उपस्थितीसाठी ओळखले जाणारे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी लोकप्रतिनिधी म्हणून घालून दिलेला आदर्श आज त्यांच्या नातवाने, सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, समर्थपणे पुढे नेत असल्याचे चित्र नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिसून आले. या अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी 100 टक्के उपस्थिती नोंदवत जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका ठामपणे बजावली.संपूर्ण अधिवेशन काळात ते दररोज सभागृहात उपस्थित राहून जनहिताच्या विविध मुद्द्यांवर सक्रियपणे सहभागी झाले.
या अधिवेशनादरम्यान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी धनगर समाज आरक्षण,शेतकरी प्रश्न, रस्ते, भुयारी गटार योजना, तलाठी कार्यालय निधी, उमेद कर्मचार्यांच्या प्रश्न, दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाई, टेंभू म्हैसाळ योजना, शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न, रोजगार, झोपडपट्टी जागा विषय, कचरा डेपो, तसेच सांगोला तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांसाठी सरकारचे लक्ष वेधले.
हिवाळी अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना, चर्चासत्रे आणि विविध विधेयकांवरील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सांगोला तालुका व परिसरातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, शिक्षक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य देत प्रश्नोत्तराच्या तासात तसेच लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाकडे ठोस भूमिका मांडली.
सभागृहातील शिस्त, सातत्यपूर्ण उपस्थिती आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आमदार देशमुख यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी ते सभागृहात उपस्थित राहून प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना, चर्चा तसेच विविध विधेयकांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेत होते.लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी एकही सत्र गैरहजर न राहता मतदारसंघाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध खात्यांचे मंत्री व वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन तालुक्याशी संबंधित विकास प्रस्ताव सादर केले. पंचायत समिती इमारत, पाणीपुरवठा योजना, रस्ते व इतर मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी अधिवेशन काळात सातत्याने केली.
*टायटन सिझन सेल*


टायटन घड्याळांवर 30% पर्यंत सूट*
स्किन परफ्यूम/वॉलक्लॉकवर 20% पर्यंत सूट
चष्म्यांवर Buy1 Get1 ऑफर*
बाटा प्रॉडक्टवर *GST* महाबचत सूट
क्रेडीट-कार्ड/बजाज फायनान्स EMI
*टायटन वर्ल्ड | टायटन आय +| बाटा*
एस टी स्टॅन्ड जवळ,भोपळे रोड,सांगोला
टायटन संपर्क – 7507 995 995
बाटा संपर्क – 7210 995 995
संबंधित बातम्या
साधी जीवनशैली, जनतेशी थेट संवाद आणि मतदारसंघात नियमित उपस्थिती ही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची ओळख आहे. अधिवेशन काळात नागपूर येथे सातत्याने उपस्थित राहून ते सभागृहात तालुक्याचा आवाज बुलंद करतात, तर अधिवेशनाबाहेर सांगोला तालुक्यातील गावोगावी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळे ते ‘सभागृहातही सक्रिय आणि मतदारसंघातही उपलब्ध’ असा लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करत आहेत.
पिढी बदलली असली तरी लोकसेवेची शिस्त, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि सभागृहातील सक्रियता कायम असल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कामकाजातून स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, सातत्य आणि सभागृहातील उपस्थिती यासाठी ओळखले जाणारे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात घालून दिलेला आदर्श आज त्यांच्या नातवाने, सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, समर्थपणे पुढे नेत असल्याचे चित्र नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दिसून आले. स्व.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणेच नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखही सभागृहात जनतेचा आवाज ठामपणे मांडत आहेत, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
सभागृहात एकही दिवस गैरहजर न राहता केलेली ही उपस्थिती केवळ आकड्यापुरती नसून लोकसेवेप्रती असलेल्या प्रामाणिकतेचे प्रतीक असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्व. गणपतराव देशमुख यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती आणि लोकसेवेची परंपरा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून समर्थपणे पुढे जात असल्याचे या हिवाळी अधिवेशनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
डॉ.गणपतराव देशमुख स्मारकासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सभागृहात आवाज
महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणारे ज्येष्ठ नेते स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाची उभारणी सांगोला शहराच्या मध्यवर्ती व नागरिकांना सहज उपलब्ध अशा ठिकाणी करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात केली. स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विधिमंडळात कार्यशिस्त, साधेपणा आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा आदर्श घालून दिला. सांगोला तालुका व परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान अतुलनीय असून, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणारे स्मारक हे केवळ वास्तू नसून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.




