Dhurandhar Box Office Collection Day 5: ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर वणवा; दिग्गजांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर, फक्त पाचच दिवसांत कमावले अब्जावधी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Dhurandhar Box Office Collection Day 5: ‘धुरंधर’नं पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर जणू वणवाच पेटवलाय आणि या आगीत अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड्स भस्मसात झालेत.

Dhurandhar Box Office Collection Day 5: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh), संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या ‘धुरंधर’ सिनेमा (Dhurandhar Movie) सध्या धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासूनच ‘धुरंधर’नं बॉक्स ऑफिस (Dhurandhar On Box Office) आपल्या ताब्यात ठेवलंय. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई करतोय. रिलीजच्या फक्त तिनच दिवसांत ‘धुरंधर’नं 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला. या सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकलाय, पण कौतुक होतंय अक्षय खन्नाच्या अभिनयाचं. अक्षय खन्नानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. अशातच ‘धुरंधर’नं पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर जणू वणवाच पेटवलाय. पाचव्या दिवशीही सिनेमानं तुफान कमाई केलीय.

‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई (Dhurandhar Box Office Collection)

सॅकनिल्कच्या अपडेटनुसार, ‘धुरंधर’नं चित्रपटगृहांमध्ये पाचव्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत 25.83 कोटींचं कलेक्शन केलं आहे. यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन 152.08 कोटी झालं आहे. सोशल मीडियावर चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. मंगळवारच्या कमाईच्या संख्येत मागील दिवसांच्या तुलनेत वाढ झाली आहे. विकेंडपेक्षा सिनेमाच्या विकडेजमधल्या कमाईत काहीशी घट पाहायला मिळते. ‘धुरंधर’च्या बाबतीत मात्र, नेमकं याच्या उलट पाहायला मिळतंय. फिल्मनं पाच दिवसांत 150 कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘धुरंधर’नं पहिल्या दिवशी तब्बल 28 कोटी कमावलेत. या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आठवड्याच्या शेवटी या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळालेली. शनिवारी (6 डिसेंबर) रोजी या फिल्मनं 32 कोटींची कमाई केली आणि रविवारी 43 कोटींची कमाई करत आतापर्यंतचं सर्वाधिक सिंगल-डे कलेक्शन केलं. सोमवारी, चित्रपटानं आपला वेग कायम ठेवला आणि 23.25 कोटींची कमाई केली.

स्पाय थ्रिलर अॅक्शन फिल्म ‘धुरंधर’

‘धुरंधर’ सिनेमा आदित्य धरनं लिहिलाय, तसेच दिग्दर्शितही केलाय. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओ आणि बी62 स्टुडिओच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली हे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्यासोबत मानव गोहिल, दानिश पांडोर, सौम्या टंडन, गौरव गेरा आणि नवीन कौशिक सहाय्यक भूमिकेत आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon