तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा-इंजि.रमेश जाधव-पाटील
सांगोला (प्रतिनिधी):- शासनाचे हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीसाठी दिनांक 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत दिलेली होती. मात्र शेतकर्यांनी वारंवार केलेल्या मागणीची दखल घेत मका खरेदी केंद्र ऑनलाईन नोंदणीची मुदत दि. 15 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
शेतकरी बांधवांनी सांगोला तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ (नेहरू चौक) सांगोला येथे खरीप हंगाम 2025-26 मका पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड, पासबुक झेरॉक्स, फार्मर आयडी इ. कागदपत्रे जमा करून ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन श्री. रमेश पां. जाधव पाटील, अध्यक्ष, सांगोला ता. शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ यांनी केले आहे.
मका खरेदीसाठी शासकीय हमीभाव रु. 2400/- (दोन हजार चारशे) इतका राहील. नांव नोंदणीशिवाय मका खरेदी केंद्रावर घेतली जाणार नाही. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. रमेश पां. जाधव पाटील यांनी केले आहे.
संबंधित बातम्या





