मोबाईल चार्जरवर दिलेल्या ‘या’ अंकांचा नेमका अर्थ काय, तुम्ही वापरत असलेला चार्जर खरंच सुरक्षित आहे का?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mobile charger safety tips: मोबाईल चार्जरवरचे अंक चार्जिंग त्याची क्षमता, सुरक्षितता आणि BIS प्रमाणितता दर्शवतात; बनावट चार्जरमुळे बॅटरी फुगणे किंवा स्फोटाचा धोका असतो. चार्जर खरेदी करताना हे अंक तपासा, ई-वेस्ट वेगळे जमा करा आणि जुना असुरक्षित चार्जर त्वरित बदलून टाका.

1/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips
2/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

मोबाईल वापरून बराचकाळ झाल्यानंतर त्याच्या चार्जिंगची क्षमता कमी होऊ लागते. मोबाईल जुना झाला आहे म्हणून असे होत असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तु्म्ही चुकीचे आहात. याचे नेमके कारण तुम्ही वापरत असलेला चार्जर आहे.

3/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

तुम्ही कधी निरीक्षण केले असेल तर, प्रत्येक चार्जरवर काही अंक छापलेले असतात. हे अंक त्या चार्जरची व्होल्ट झेलण्याची क्षमता, तो चार्जर खरा आहे की बनावट आहे तसेच तो कोणत्या प्रकारच्या मोबाईलसाठी बनवला गेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तो सुरक्षित आहे की नाही; या सर्व गोष्टी दर्शवतात.

4/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

चार्जरवरील BIS लोगो आणि R-नंबर असलेले अंक हे दर्शवतात ते की उत्पादनाची चाचणी घेण्यात आली आहे आणि ते भारतीय मानकांचे पालन करते. हे अंक नसलेला चार्जर वापरल्यास तुमच्या मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते.

5/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

जर एखाद्या चार्जरवर INPUT 100-240V असे काही अंक आणि मजकूर असेल तर तो चार्जर भारतात आणि परदेशात दोन्हीकडे वापरता येऊ शकतो. तसेच OUTPUT 5V 2A/9V 2A हे अंक तुमच्या मोबाईलला योग्य चार्जिंग मिळते याची खात्री देतात.

6/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

IS 13252 आणि IEC 60950-1 चार्जरवरील हे अंक आंतरराष्ट्रीय सुरक्षितता दर्शवतात. याचा अर्थ चार्जरमुळे आग लागणार नाही किंवा शॉक बसणार नाही. त्यामुळे हे अंक असलेले चार्जर वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे.

7/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

तुम्ही निरीक्षण केले असेल तर चार्जरवर कचऱ्याचा आणि त्यावर फुल्ली असे चिन्ह असते.  याचा अर्थ हा चार्जर हा ई-वेस्ट आहे, त्यामुळे त्याला रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकून न देता वेगळा जमा करावा.

8/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

चार्जर बनावट असेल तर त्यावर हे अंक नसतात किंवा बनावट पद्धतीचे असतात. अशा चार्जरमुळे मोबाईलची बॅटरी फुगते आणि तो खराब होतो.

9/9

मोबाईल चार्जर सुरक्षितता टिप्स

Mobile charger safety tips

या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी भविष्यात कोणताही चार्जर खरेदी करताना त्यावरील अंक दिलेल्या माहितीच्या मदतीने तपासा आणि योग्य चार्जर विकत घ्या. तसेच तुम्ही वापरत असलेल्या चार्जरवर वरील मुद्द्यांमधील कोणतेही चुक आढळल्यास तो लगेचच बदला.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon