Gold Silver Rate in Mumbai : आनंदाची बातमी… लग्नसराईच्या दिवसांत चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! सोन्याच्या दरात मोठे उलटफेर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Today Gold, Silver Rate December 05: सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूच्या दरांनी युटर्न घेतला असून यामुळे खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असेल. सोन्याचा भाव किंचित कमी झाला असला तरीही चांदीचा भाव तब्बल 4000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Gold Rate Today : तुम्ही आज लग्नासाठी दागिने खरेदीला जाणार असाल तर आजचा सोन्याचा 10 ग्रॅम भाव नक्की जाणून घ्या. रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या MPC बैठकीतील निर्णयांआधी सोन्या आणि चांदीच्या दरांना उतरती कळा लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदी स्वस्त झालं असून दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये किमतीत फरक दिसून आला तर या दरम्यान, चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

सोने-चांदीचा आजचा दर काय

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर बाजाराच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण निर्णयापूर्वी शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी दर घसरले. मात्र, कमवत डॉलर आणि वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीतील घसरण मर्यादित राहिली. अमेरिकन डॉलर एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला असून एमसीएक्स सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा 0.14% घसरून 1,29,892 प्रति 10 ग्रॅमवर होता पण, चांदीचे फ्युचर्स 0.74४% वाढून 1,79,461 प्रति किलोवर पोहोचला.

दुसरीकडे, देशांतर्गत सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 129,660 रुपयांवर आली आहे. सध्या देशांतर्गत गुंतवणूकदारांचे लक्ष आरबीआयच्या एमपीसी धोरण निर्णयावर असून संमिश्र आर्थिक संकेतांमुळे आरबीआयच्या धोरण निर्णयाबद्दल तज्ञांमध्ये मतभेद पाहायला मिळू शकतात. जीडीपीचे मुख्य आकडे मजबूत असले तरी, नाममात्र जीडीपी आणि उत्पादन क्षेत्रातील कमकुवतपणा 25-बेसिस-पॉइंट दर कपातीच्या दृष्टिकोनाला समर्थन मिळू शकतो.

त्याचवेळी, जागतिक पातळीवर गुंतवणूकदार आज उशिरा येणार्‍या अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत, जी पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाबद्दलच्या अपेक्षांना आकार देईल. अलिकडच्या मिश्रित अमेरिकन मॅक्रो डेटामुळे फेडच्या पुढील धोरणात्मक निर्णयावर अनिश्चितता निर्माण झाली होती.

18, 22,24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत
गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,29,650 रुपये आहे तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 1,18,840 रुपयांना मिळत असून 18 कॅरेटचे 10 ग्रॅम सोन्यासाठी 97,230 रुपयांना मिळत आहे. याशिवाय एक किलो चांदीची किंमत भारतीय बाजारांमध्ये 1,90,900 रुपयांवर उसळली आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon