शिवसेनेचा पोस्टमन स्टाईल प्रचार सांगोल्यात ठरला चर्चेचा विषय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

विकासपत्र’ घेऊन पोस्टमन अवतरले सर्वांच्या घरी

सांगोला – नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने यंदा वेगळा आणि आकर्षक पद्धतीचा प्रचार अवलंबला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदभाऊ माने व प्रभागातील शिवसेनेचे उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचण्यासाठी पोस्टमनच्या वेशभूषेत प्रचार मोहीम राबवली. पारंपरिक पोशाखात प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना विकासाची पत्र स्वरूपातील माहिती देत संवाद साधला.‘पोस्टमन’ अवतरल्याने शहरात हा प्रचार मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणूक रिंगण दिवसेंदिवस तापत असताना प्रत्येक पक्ष नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांनी आपल्या प्रचारात नवेपन आणण्यासाठी पोस्टमनच्या शैलीत घराघरांत जाऊन संवाद साधण्याची मोहीम सुरू केली आहे.

पुणे येथील टीम कडून 23 युवक पोशाख परिधान करून नागरिकांच्या दारात पोहोचत आहेत. आपल्यासाठी विकासाचे पत्र या नावाने विशेष पत्र तयार करण्यात आले आहे.

नमस्कार आई / काका / ताई / दादा पत्र घेवून आलोय माहित आहे मला आता मोबाईलवर व्हिडीओ / रिल्स् बघण्यात वेळ चांगलाच रमतो. त्यामुळे पत्र व्यवहार पुर्णपणे बंद झालेला आहे. पान पत्रातून जे काही सांगितले जातं त्यात प्रेम/जिव्हाळा.. एखादया व्हिडीओ पेक्षाही जास्त स्पष्ट दिसतो आणि पत्र पाठवणारा माणुस ही तितक्याच जिव्हाळ्याचा असतो. आज जे पत्र मी घेवून आलोय ते अतिशय जिव्हाळाचे व सगळ्यांवर माया करणारे कधी कोणाचा द्वेष न करणारे… माणासांना जोडणारा… ऑन डयूटी 24 तास काम करणारा लोकांचा लोकप्रिय आपला माणूस श्री. आनंदा यशोदा गोरख माने.

सदर पत्रात आई/काका/ताई/दादा तुम्ही ओळखताच मला.. मी तुमच्यातलाच तुमचा माणूस तुम्ही माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवलात आणि त्यामुळे मला तुमच्यासाठी कामें करता आली, मग ते रस्ते असतील, वाड्यावस्त्यावरील लाईट पोलचे काम असेल, शहरामध्ये विविध ठिकाणी बसण्याचे बाकडे असतील, टाकाऊ कचर्‍याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. कोरोना काळात 3000 पेक्षा अधिक गोरगरिब जनतेला अन्न-धान्य कीट वाटप केले. जिवाची पर्वा न करता औषधं फवारणी केली हे सगळ मला करता आलं. अजुनही ध्येय गाठायचं बाकी आहे. कारण मा. एकनाथ शिंदे साहेबांचे व्हिजन फार मोठं आहे. पण हे शक्य करणं तुम्हा मतदारांच्या मतात आहे. आदरणीय शहाजी (बापू) पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. तरी मला आणि माझे सहकारी उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजय करुन नगरपालिकेत पाठवाल अशी खात्री आहे. शिवसेनेचा (शिंदे गट) शिवसैनिक आदरणीय मा. शहाजी (बापू) पाटील यांच्या नेतृत्वात तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. तेव्हा निशाणी लक्षात ठेवा धनुष्य बाण.. धनुष्य बाणा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा करण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे. निवडणुकीत नेहमीचे नारे आणि मंच सभांपेक्षा अशा वेगळ्या उपक्रमामुळे मतदारांचे लक्ष वेधले जात आहे. पोस्टमन अवतारातील प्रचार सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, यामुळे शिवसेनेचा प्रचार अधिक गतीमान झाला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon