Hyundai Venue 2025 vs Tata Nexon: अलीकडेच लॉन्च झालेली Hyundai Venue 2025 आणि आधीपासूनच लोकप्रिय असलेली Tata Nexon या दोन्ही SUV सर्वात मजबूत गाड्या आहेत.
Hyundai Venue 2025 vs Tata Nexon: भारतामध्ये sub-4 meter SUV सेगमेंट दिवसेंदिवस जास्तच रोमांचक होत चाललं आहे. आता या वर्गात फक्त लुक्स किंवा मायलेज नाही, तर टेक्नॉलॉजी, फीचर्स आणि सेफ्टी हेदेखील खूप महत्त्वाचं ठरतंय. अलीकडेच लॉन्च झालेली Hyundai Venue 2025 आणि आधीपासूनच लोकप्रिय असलेली Tata Nexon या दोन्ही SUV सध्या या सेगमेंटमधल्या सर्वात मजबूत गाड्या आहेत.
चला तर पाहूया, या दोन्हींपैकी कोणती SUV तुमच्यासाठी जास्त चांगली ठरू शकते.
किंमतीत कोण पुढे? (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon Price)
- किंमतीच्या दृष्टीने Tata Nexon थोडी स्वस्त आणि परवडणारी आहे. Nexon ची ex-showroom price ₹7.32 लाखांपासून ₹14.15 लाखांपर्यंत आहे, तर Hyundai Venue ची किंमत ₹7.90 लाखांपासून ₹15.69 लाखांपर्यंत जाते.
- Venue च्या टॉप व्हेरिएंटमध्ये dual 12.3-inch screen setup, Bose sound system, voice-controlled sunroof आणि Level-2 ADAS असे प्रीमियम फीचर्स मिळतात.
- दुसरीकडे, Nexon आपल्या दमदार design आणि 5-star safety rating मुळे ग्राहकांना आकर्षित करते.
डिझाइन आणि साइज (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon Design)
- दोन्ही SUV ची लांबी 3,995mm आहे, पण डिझाइनचा प्रभाव मात्र वेगळा आहे.
- Nexon ची रुंदी 1,804mm आणि ground clearance 208mm आहे, त्यामुळे ती जास्त muscular आणि rough दिसते.
- तर Venue चं डिझाइन थोडं sharp आणि compact आहे, जे शहरात चालवायला सोयीचं वाटतं.
- जर तुम्ही वारंवार खडबडीत रस्त्यांवर गाडी चालवत असाल, तर Nexon चा ground clearance अधिक फायद्याचा ठरेल.
इंजिन आणि परफॉर्मन्स (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon)
- Hyundai Venue मध्ये तीन इंजिन पर्याय आहेत
- 1.2L पेट्रोल
- 1.0L टर्बो पेट्रोल
- 1.5L डिझेल
- यात डिझेल इंजिनसोबत automatic transmission ही दिली आहे, जे या सेगमेंटमध्ये क्वचितच दिसतं.
Tata Nexon मध्ये दोन इंजिन पर्याय आहेत (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon Engine)
- 1.2L टर्बो पेट्रोल
- 1.5L डिझेल (260Nm टॉर्कसह)
- याशिवाय Nexon चा Turbo-CNG version ही लॉन्च झाली आहे, जी अधिक किफायतशीर आहे.
संबंधित बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 November 2025
Sharad Pawar : भाजपसोबत युती नको, मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीची इनसाईड स्टोरी
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर
सांगोला : भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी अखेर रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ; 40 मतदान केंद्रावर होणार मतदान होणार
मायलेजमध्ये कोण पुढे? (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon Mileage)
- Nexon Diesel AMT चा दावा आहे 24.08 kmpl, तर Venue Diesel देते 20.99 kmpl.
- पेट्रोल वेरिएंटमध्ये Venue थोडी पुढे आहे आणि ती 20 kmpl पर्यंत मायलेज देते.
- Nexon CNG चं मायलेज सुमारे 25 km/kg आहे, ज्यामुळे ती low-cost option ठरते.
फीचर्स आणि टेक्नॉलॉजी (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon feature and technology)
- Venue 2025 ला टेक्नॉलॉजीच्या बाबतीत Nexon वर थोडी आघाडी आहे.
- यात dual 12.3-inch screen, Bose sound system, ventilated seats, आणि ambient lighting सारखे फीचर्स आहेत.
- Nexon मध्येही 10.25-inch touchscreen, JBL sound system, wireless charging आणि touch HVAC controls मिळतात, जे प्रॅक्टिकल आहेत.
- Venue चं केबिन अधिक मॉडर्न वाटतं, पण Nexon ची build quality आणि driving comfort तिची मोठी ताकद आहे.
सेफ्टी (Hyundai Venue 2025 vs Tata Nexon safety)
- सेफ्टीच्या बाबतीत Nexon भारतातील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक आहे.
- तिला Global NCAP आणि Bharat NCAP दोन्हींकडून 5-star rating मिळाली आहे.
- तर Venue 2025 मध्ये आता Level-2 ADAS दिलं आहे, ज्यात
- lane keep assist, smart cruise control, collision alert, आणि driver attention warning असे फीचर्स मिळतात.
- याशिवाय 6 airbags, ESC, आणि tyre pressure monitoring system सुद्धा दिलं आहे.





