गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

बैठी जीवनशैली आणि हालचाल कमी झाल्याने अनेकांना कमी वयातच अनेक आजार होत आहेत. जर तुम्हाला हाडे आणि मसल्स कायम ठेवत वजन कमी करायचे असेल तर गव्हाची चपाती बंद करुन या पिठाच्या भाकरी खाव्यात…

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते खाल्ले जात आहे. आणि रात्री जड जेवण घतेल्याने पोटात चरबी साठत आहे. त्यामुळे वजन वाढल्याने अनेक आजार होत आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी महागड्या जिम जॉईंट करत आहेत. महागड्या डाएट आणि निरनिराळे उपाय करुनही वजन काही केल्या कमी होत नसल्याचे पुढे येत आहे.

परंतू यावरील उपाय तुमच्या किचनमध्ये लपलेले आहे. रोज तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर तिला बदला आणि त्याऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खात जा. त्यामुळे कोणताही जास्त व्यायाम न करता तुम्हाला वजन कमी करता येऊ शकते. चला तर पाहूयात वजन कमी करण्यासाठी कोणत्या पीठाची भाकरी खाणे योग्य आहे. वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी उपयोगी असते ते पाहूयात…

ज्वारीची भाकरी – फिटनेस आणि एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणजे ज्वारी आहे. जे लोक जिममध्ये जातात आणि वर्कआऊट करुन मसल्स बनवू इच्छीत आहेत त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी वरदान ठरू शकते.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon