सांगोला :
राजभवन आयोजित इंद्रधनुष्य युवा महोत्सव येथील सांगोला महाविद्यालयाच्या कु.श्रुती विजय घाडगे, कु.साक्षी बाळासो कदम व रितेश महेश धनवडे या तीन विद्यार्थ्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थी कलाकारांचे कला,साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे कडून अभिनंदन होत आहे.
हा इंद्रधनुष्य युवा महोत्सव दि.५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान डॉ.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महारास्ट्र विद्यापीठ जळगाव येथे होत आहे . या महोत्सवामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ सहभागी होत आहे. या महाविद्यालयाचे हे तीन विद्यार्थी विद्यापीठ संघामध्ये आपले सादरीकरण करणार आहेत.
येथील सांगोल महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचा युवा महोत्सवनुकताच पार पडला. या युवा महोत्सवामध्ये या महाविद्यालयाच्या संघाने नागा लोकनृत्य आणि लावणीचे दमदार सादरीकरण करत नृत्यविभागाच्या चम्पियनशिप पटकावली ,यामध्ये कु. साक्षी कदम हिने सहभाग घेतला होता.तिची निवड विद्यापीठ संघामध्ये झाली आहे. नाट्य विभागातील एकाकिका, लघुनाटिका, पथनाट्य व मूकनाट्य कलाप्रकारामध्ये चांगले यश या महाविद्यालयाने मिळवले. या महाविद्यालयाची चिट्टी एकाकिका या महोत्स्वमध्ये चागलीच गाजली या एकाकीकेतील नायिका मनीषा हिची भूमिका कु .श्रुती घाडगे हिने केली होती, तिला स्त्री अभिनयाचे दिव्तीय पारितोषिक मिळाले होते, तिची निवड विद्यापीठ संघामध्ये झाली आहे. या महाविद्यालयास पंधरा पारितोषिके मिळविण्यासाठी रितेश धनवडे याचा महत्वाचा वाटा आहे. त्याची ही निवड विद्यापीठ संघामध्ये झाली आहे.
संबंधित बातम्या
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, डॉ.रामचंद्र पवार, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा. डॉ.नवनाथ शिंदे, प्रा. एम.एस. बडवे, प्रा. विशाल कुलकर्णी. डॉ. सदाशिव देवकर, डॉ. विद्या जाधव, प्रा. अपूर्वा गोपालकर, प्रा.रोशनी शेवाळे, प्रा.तेजश्री मिसाळ, प्रशिक्षक डॉ.सिद्धार्थ सोरटे, अँड.मारुती वाघमोडे, धनंजय काजोळकर, प्रकाश पवार, विजय आलासे, रितेश साळवे, दिग्विजय जावीर, सिद्धनाथ जावीर, गोरख जावीर, प्रतिक काटे यांचे सह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.





