स्वयंपाकासाठी योग्य तेलाची निवड आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मोहरीचे तेल किंवा रिफाइंड डालडा तेल हानिकारक असू शकते. त्यामुळे जेवण बनवताना योग्य आणि आरोग्यासाठी हानिकारक नसणारंच तेल वापरले पाहिजे. त्यासाठी कोणते पर्याय आहेत हे जाणून घेऊयात.
सणासुदीच्या काळात, किंवा रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी देखील एक गोष्ट आहे ज्याशिवाय जेवण तयार होऊ शकत नाही. ते म्हणजे तेल. भाजी बनवण्यासाठी, काही तळण्यासाठी तेल हे लागतेच. बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल किंवा रिफाइंड डालडा तेल वापरले जाते. तथापि, हे आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते. आता, मग आरोग्यासाठी चांगले असणारे स्वयंपाकाचे तेल कोणते जे कोणताही विपरीत परिणाम करत नाही. या तेलांमध्ये बनवलेले अन्न खाल्ल्याने तुमचे हृदय आणि मनही निरोगी राहील आणि वजन वाढण्यासही प्रतिबंध होईल. स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरले पाहिजेत हे जाणून घेऊयात.
प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टांच्या म्हणण्यानुसार तुम्ही योग्य स्वयंपाक तेल निवडले तर तुमच्या आरोग्याचे कधीही नुकसान होणार नाही. खरं तर, ते तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवेल.
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरणे चांगले?
नारळाचे तेल
आपण वर्षानुवर्षे नारळाचे तेल वापरत आहोत, पण तुम्ही कधी ते स्वयंपाकासाठी वापरले आहे का? या तेलात बनवलेले अन्न लवकर खराब होत नाही किंवा जळत नाही. ते कमी तेलकट देखील मानले जाते. नारळाचे तेल शरीराला ऊर्जा प्रदान करते.
शेंगदाणा तेल
तुम्ही स्वयंपाकासाठी शेंगदाण्याचे तेल देखील वापरू शकता. शेंगदाण्याच्या तेलात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. शिवाय, त्यात शिजवलेले अन्न खराब होत नाही.
संबंधित बातम्या





तूप
शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तूप वापरले जात आहे. तथापि, तूप महाग आहे, म्हणून लोक बहुतेकदा तेल किंवा रिफाइंड तेलाचा वापर करतात. तुम्ही तूप वापरून देखील स्वयंपाक करू शकता. पण नक्कीच प्रमाणातच वापर करा.
एवोकॅडो तेल
अॅव्होकॅडो तेल हे देखील सर्वोत्तम तेल मानले जाते. अॅव्होकॅडो तेलाला सुगंध असतो आणि त्यात तयार केलेले पदार्थ चांगले टिकतात .तसेच त्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्रास होत नाही
दरम्यान या तेलापैकी कोणतेही तेल वापरत असाल तरी ते प्रमाणातच वापर करा. कारण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाणे हानिकारकच असते. त्यामुळे प्रमाणात वापर केल्यास त्याचे आरोग्याला फायदे नक्की मिळतात.