Asia Cup Pakistan to Pull Out : पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने धमकी खरी करुन दाखवली, तर आशिया कप स्पर्धेत मोठा बदल होऊ शकतो.
दुबई : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झाला आहे. पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी करत ICC कडे तक्रार केली आहे. आयसीसीने मागणी मान्य न केल्यास यूएई विरुद्धचा सामना पाकिस्तानी संघ खेळणार नाही, असा इशाराच पाकिस्तानी बोर्डाने दिला आहे. त्यामुळे आशिया कपमधील रंगत वाढली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाल्यानंतर टीम इंडियाने नेहमीप्रमाणे हस्तांदोलन केले नाही. त्यांनी ड्रेसिंग रुमचा दरवाजाही बंद केला. त्यामुळे पाकिस्तानचे कॅप्टन सलमान आघा आणि कोच माईक हेसन यांनी नाराजी व्यक्त केली होती. सलमानने सामना संपल्यानंतर होणाऱ्या प्रेझेंटेशनमध्येही भाग घेतला नाही, संजय मांजरेकर यांच्याशी बोलणेही टाळले.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने धमकी खरी करुन दाखवली, तर आशिया कप स्पर्धेत मोठा बदल होऊ शकतो. जर पाकिस्तानने यूएई विरुद्धचा सामना खेळला नाही, तर ते स्पर्धेतून बाहेर फेकले जातील. यूएई संघाला आपसूक दोन गुण मिळतील. पाकिस्तानने सामना सोडल्यास ते फक्त दोन गुणांलक राहतील. हे गुण सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत. कारण भारत आणि यूएई दोघांनाही प्रत्येकी चार गुण मिळतील.
यूएईने ओमानला हरवल्यामुळे भारताने सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप A मध्ये भारत दोन सामन्यांतून चार गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूएईचे सुद्धा दोन गुण आहेत, पण त्यांचा रन रेट कमी आहे. जर पाकिस्तानने सामना सोडला, तर यूएईला त्याचे गुण मिळतील आणि ते सुपर फोरमध्ये पोहोचतील. ओमानची टीम स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
सम्बंधित ख़बरें





भारताने यूएई आणि पाकिस्तानला हरवून आधीच चार गुण मिळवले आहेत. जर पाकिस्तानने यूएई विरुद्ध सामना खेळला, तर तो सामना खूप महत्त्वाचा असेल. जो जिंकेल तो सुपर फोरमध्ये जाईल. त्यामुळे कोणता संघ भारतासोबत पुढे जाईल हे त्या सामन्यावर अवलंबून आहे.
आता हे सर्व ICC च्या निर्णयावर अवलंबून आहे. पाकिस्तानने मागणी केली आहे की, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवा. मात्र तेच यूएई विरुद्धच्या सामन्याचे अधिकारी असणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे अँडी पायक्रॉफ्ट यांच्या बदलीची मागणी केली आहे. जर ICC ने आमची मागणी मान्य नाही केली, तर आम्ही यूएई विरुद्धचा आशिया कपमधील सामना खेळणार नाही, असे PCB ने म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर ICC काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी आलेल्या माहितीनुसार, ICC पाकिस्तानच्या धमक्यांना फारसे गांभीर्याने घेणार नाही. त्यामुळे आशिया कपच्या सुपर 4s मध्ये कोण जाईल, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.