Asia Cup 2025 Prize Money: आशिया चषक पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती रुपयांचं बक्षीस दिले जाईल, याबाबत माहिती समोर आली आहे.
Asia Cup 2025 Prize Money: आशिया कप 2025 च्या स्पर्धेची (Asia Cup 2025) सुरुवात 9 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने झाली. यंदा आशिया चषकाची स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, यूएई आणि हाँगकाँग असे एकूण आठ संघ आहेत. आशिया चषकाच्या स्पर्धेत या आठ संघांमधून सध्या भारत हा एकमेव संघ सुपर-4 मध्ये पोहचला आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल.
विजेत्या संघाला किती पैसे मिळतील? (Asia Cup 2025 Prize Money)
दरम्यान, आशिया चषक पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती रुपयांचं बक्षीस दिले जाईल, याबाबत माहिती समोर आली आहे. आशिया चषक जिंकणाऱ्या संघाला 2.60 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 1.30 कोटी रुपये दिली जाईल. भारताने आधीच 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे.
भारत सुपर 4 मध्ये दाखल- (Team India In Super 4)
आशिया चषकातील अ गटात भारतानं दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यूएई आणि पाकिस्तानवर भारतानं विजय मिळवत 4 गुण मिळवले.
पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट-
यूएईनं ओमानवर विजय मिळवत 2 गुण मिळवले आहेत. आशिया कपमधील आव्हान यूएईनं कायम ठेवलं आहे. अ गटात भारत आता 4 गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर यूएई तिसऱ्या स्थानावर आहे. आता पाकिस्तान आणि यूएई यांच्यात लढत होईल. या लढतीतील विजयी संघ अ गटातून सुपर फोरमध्ये दाखल होईल. यूएईनं विजय मिळवल्यास पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.
आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक-
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सम्बंधित ख़बरें





सुपर-4 आणि अंतिम सामना-
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना