Pandharpur: आज श्रावणातील पहिलीच एकादशी आहे, याच पुत्रदा एकादशीनिमित्त अवघे पंढरपूर भाविकांनी फुलून गेलंय. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.

Pandharpur Maharashtra Putrada Ekadashi 2025 marathi news Pandharpur decorated for Putrada Ekadashi Vitthal Rukmini temple
1/8

आज श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
2/8

यासाठी रंगीबेरंगी पंचवीस प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांनी मढविण्यात आले आहे.
3/8

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे .
4/8

श्री विठ्ठलाचा,रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच मंदिराच्या सोळ खांबी,चार खांबी अशा विविध भागांना लाल गुलाब, पिवळा गुलाब, शेवंती,कनेर, अष्टर, शेवती, जाई, जुई,सुपारीची फुले अशा देशी विदेशी दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
5/8

फुलांच्या सजावटीमध्ये देवाचे मनमोहक रूप अधिकच खुलून दिसत आहे.
6/8

श्रावण महिन्यातील पहिलीच एकादशी असल्यामुळे हजारोच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
7/8

विठ्ठल मंदिरात केलेली फुलांची सजावट आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
8/8

image 8
 
				 
         
         
         
															 
                    



 
    
    
        