देशातील ज्योतिर्लिंग भाविकांनी गजबजले, दर्शनासाठी लांबच लांब रांगा; पाहा Photos

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आज, श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या.

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने देशभरातील महत्त्वाच्या ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या ठिकाणी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

1 / 8
नाशिकमधील येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली होती. श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. त्यापूर्वी विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला.

2 / 8
श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा वास त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असल्याने श्रावणात येथील दर्शनाचे अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते.

3 / 8
तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातही श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रात्री बारा वाजल्यापासूनच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.

4 / 8
श्रावणामुळे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे पाच क्विंटल फुलांनी सुंदर आरास केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात १३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

5 / 8
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आली असून, विशेष पासची सुविधाही उपलब्ध आहे. स्वयंसेवक आणि पोलिसांची विशेष यंत्रणा येथे कार्यरत आहे. आज सुमारे एक ते दीड लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे.

6 / 8
तसेच पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथेही आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते.

7 / 8
श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेची आरती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. भीमाशंकर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे.

8 / 8
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon