Rohit Sharma & Virat Kohli to return to England: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दरम्यान, दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील.
IND vs ENG once again in July 2026: भारतीय क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसू शकतात.
कधी पासून सुरु होणार टी20 मालिका?
टी20 मालिकेची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होणार असून ही मालिका 11 जुलै 2026 पर्यंत खेळवली जाईल. पाच सामन्यांची ही मालिका खालीलप्रमाणे होणार आहे:
1 जुलै: पहिला टी20 – डरहम
4 जुलै: दुसरा टी20 – मँचेस्टर
7 जुलै: तिसरा टी20 – नॉटिंगहॅम
9 जुलै: चौथा टी20 – ब्रिस्टल
11 जुलै: पाचवा टी20 – साउथॅम्प्टन
वनडे मालिका कधीपासून सुरु होणार?
वनडे मालिका 14 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील सामने पुढील ठिकाणी पार पडतील:
14 जुलै: पहिला वनडे – बर्मिंगहॅम
16 जुलै: दुसरा वनडे – कार्डिफ (सोफिया गार्डन्स)
19 जुलै: तिसरा वनडे – लॉर्ड्स, लंडन
हे ही वाचा:
भयंकर! स्विफ्ट कार थेट कॉलेज तरुणींच्या घोळक्यात घुसली, मुलीला 100 फूट फरफटत नेलं