टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तुकडाबंदी कायद्याचा तुकडाच पाडला, 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी, कायद्यातील जाचक अटी शिथिल, असा होणार फायदा

Land Fragmentation Law : राज्यातील 50 लाख नागरिकांना त्यांच्या जागेची मालकी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अडचणीचा ठरणारा कायदा लवकरच रद्दबातल ठरेल. शेतकरीच नाही तर महापालिका, पालिका हद्दीनजीक राहणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा महायुती सरकारने दिला आहे.

राज्यातील 50 लाखा नागरिकांसाठी महायुती सरकारने मोठी आनंदवार्ता आणली. राहत्या जागेच्या मालकीचा प्रश्न एका झटक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडवला. इतक्या दिवसांपासून तुकडेबंदी कायद्याविषयीचे गुळपीठ सुरू होते. अडचणीचा ठरणारा कायदा लवकरच रद्दबातल ठरेल. शेतकरीच नाही तर महापालिका, पालिका हद्दीनजीक राहणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा महायुती सरकारने दिला आहे. तुकडेबंदी कायदा तुर्तास शिथिल करण्यात आला आहे. लवकरच तो रद्द होईल. विशेष म्हणजे या कायद्यान्वये सध्या 1 जानेवारी 2025 रोजीपर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण करण्यात येणार आहे. या वर्षात बावनकुळे यांनी राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना आनंदवार्ता देण्याचा धडकाच लावला आहे.

विधानसभेत काय केली घोषणा?

राज्यात जमिनीचे व्यवहार रोज होतात. पैशांची देवाण-घेवाण करण्यात येते. पण 7/12 वर या व्यवहाराची नोंद होत नाही. तुकडाबंदी कायद्यामुळे या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप येत नाही. आता कायद्याची ही मोठी अडचणच राज्य सरकारने दूर करण्याची घोषणा केली आहे. तुकडाबंदी कायद्यातील अटी तुर्तास शिथिल करण्यात आल्या आहेत. कायद्यात बदलासाठी, सुधारणेसाठी अथवा कायदा रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. तोपर्यत 1 जानेवारी 2025 पर्यंतचे व्यवहार नियमीत करण्यात येतील. नागरिकांना हा मोठा दिलासा आहे.

नागरिकांना द्यावे लागणार नियमन शुल्क

तुकडाबंदी कायद्यातंर्गत व्यवहारांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मुभा दिली आहे. व्यवहार नियमित करताना नियमन शुल्क आकारले जाणार आहे. बाजारमूल्याच्या 5 टक्के रक्कम शुल्क नागरिकांना सरकार दरबारी जमा करावे लागेल.

कायदा रद्द करण्यासाठी समिती

तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याबाबत आता चार अधिकार्‍यांची एक समिती नेमण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसात त्यासाठी कार्यपद्धती जाहीर होईल. अधिकाऱ्यांची समिती याविषयीचा अहवाल सादर करतील. त्यानंतर तुकडाबंदी कायदा रद्द करण्याविषयीचा निर्णय जाहीर करण्यात येईल. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, प्राधिकरण क्षेत्र, गावाठाणलगतच्या 200 ते 500 मीटरपर्यंतचा भाग आणि महापालिका सीमेलगतचा दोन किलोमीटर परिसराला नवीन कार्यपद्धतीत जोडण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..

Gold Price Today : सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..

रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

MSRTC NCMC Card : मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, प्रताप सरनाईक यांची घोषणा

Rohit Pawar: कर्जमाफीसाठी अगोदर 50 हजारांची वसुली? रोहित पवारांचा आरोपांचा नवा बॉम्बगोळा… कर्जमाफीसाठी पंढरपूरमध्ये एल्गार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारकडून ३४५ कोटी रुपये वर्ग, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?