आषाढी संपताच उजनी धरणातून विसर्गाच्या हलचाली; चंद्रभागा पुन्हा खळाळणार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

खडकवासला व इतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने आता उजनी धरणातून आज पाणी सोडावे लागणार आहे

Maharashtra Dam water Update: राज्यभर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. धरणक्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक धरणे भरून वाहू लागली आहेत. उजनी, गोसेखुर्द, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी संपर्क तुटल्याचीही माहिती आहे. आषाढी एकादशीनंतर आता उजनी धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. गोसीखूर्द धरणाचे आज दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. काय परिस्थिती आहे पाहुया..

उजनी धरणातून आज विसर्ग सुरू होणार

उजनी धरणाची पाणी पातळी 85% टक्के पर्यंत पोचल्याने आज उजनी धरणातून सकाळी पाणी सोडावे लागणार आहे. आज आषाढी द्वादशी असून लाखो भाविक सोहळा संपवून परतीच्या मार्गाला लागले आहेत .. आषाढी सोहळ्यात महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनाने नियोजन करून उजनीतून पाणी सोडणे बंद केले होते .. मात्र आता उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने आज उजनी धरणातून 10 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ..

 

वीर धरणातूनही जवळपास 5000 क्युसेक विसर्गाने पाणी भीमा नदीकडे सोडले असून आता आज पाणी सोडल्यास 21 तासानंतर म्हणजे यात्रेची गर्दी पूर्ण कमी झाल्यानंतर उजनीचे पाणी पंढरपूर मध्ये चंद्रभागेत पोहोचणार आहे.  सध्या उजनी धरणात 15000 क्युसेक विसर्गाने पाणी येत असून पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला व इतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने आता उजनी धरणातून आज पाणी सोडावे लागणार आहे

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon