सांगोला महाविद्यालयात M.C.A., M.Sc. (A.I. & M.L.) व B.Sc. (Data Science) अभ्यासक्रमांना मान्यता – विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला:-

सांगोला शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून M.C.A. (Master of Computer Applications) M.Sc. (A.I. & M.L.) व B.Sc. (Data Science) नवीन तीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत.

या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासन व आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मंजुरी मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार उच्च शिक्षण घेण्याची संधी आता सांगोला आणि परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच मिळणार आहे.

महाविद्यालयात सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अभ्यासक्रम रचना यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विदयार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री.नागेश गुळमिरे, सचिव श्री.ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे व सदस्य, संगणक विभागप्रमुख डॉ. राजकुमार ताठे, प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन महाविदयालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon