हातीद येथे जन्मदात्या पित्यानेच केला मुलाचा खुन

सांगोला:- मुलाचे आई सोबत भांडण सुरू असताना वडील सोडविणेस गेले असता मुलाने ढकलुन दिल्याचा राग मनात धरुन जन्मदात्या पित्यानेच मुलाचा खुन केला असल्याची घटना सांगोला तालुक्यांतील हातीद येथे 10 जानेवारी रोजी घडली.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेले माहिती अशी की, मौजे हतीद ता. सांगोला येथील शिंपीवस्ती शाळेचे पाठीमागे हातीद गावचे हद्दीत असले सामाईक जमीन मध्ये काटेरी झाडे झुडपे तोडून त्याचा कोळसा तयार करण्यासाठी राहणेस आलेले कोळसेवाले रामा किसन पवार , गौरी रामा पवार, रोहीदास रामा पवार, सर्व मुळ रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता.माणगांव, जि. रायगड असे कुटूंबासह राहणेस होते. शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी 7.30 वाचे सुमारास गुन्ह्यातील मयत रोहीदास पवार हा त्याची आई गौरी पवार हीस शिवीगाळ व हाताने मारहाण करीत असताना यातील रामा पवार हे सोडविणेस गेले असता त्यास मयताने ढकलुन दिल्याचा राग येवुन आरोपीने त्याचा मुलगा रोहीदास वय 18 वर्षे याचे डोकीत कु-हाडीचे घाव घालुन त्याचा खुन केला आहे.
बिरा बडगर रा. हतीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी रामा पवार रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन त्यास दिनांक 12/01/2025 रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्याचे तपासात पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुजारी हे करीत आहेत.