maharashtra

पुन्हा एकदा सांगोला शहर हादरले गुढ आवाजाने; लोक पडले घरातून घाबरून बाहेर

सांगोला -सांगोला शहर व तालुका सोमवारी सकाळी ९ : ५२ च्या सुमारास पुन्हा अचानक धुडूंब अशा गुढ आवाजाने हादरला. प्रचंड मोठ्या आवाजामुळे जमीन हादरली, घराची तावदाने थरथरली. नागरिकांनी घाबरून घराच्या बाहेर धाव घेत एकमेकांना कशाचा मोठा आवाज झाला म्हणून चौकशी करू लागले तर प्रशासनाकडून गुढ आवाजाबाबत कानावर हात ठेवल्यामुळे नेमका कशाचा व कोठून आवाज होतोय याचा अद्याप उलगडा झाला नाही दरम्यान गुढ आवाजामुळे शेजारील आटपाडी, मंगळवेढा,जत तालुकेही हादरल्याचे अनेकांनी फोनवरून सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला शहर व तालुका यापूर्वी अनेक वेळा प्रचंड गुढ आवाजाच्या घटनांनी हादरला आहे. मात्र हा गुढ आवाज नेमका कशाचा होतो, कोठून होतो , गुढ आवाजाचा मुख्य केंद्रबिंदू कोठे आहे याचा शोध अद्याप प्रशासनाला घेता आलेला नाही. तज्ञांच्या मते हा आवाज फायटर विमानाचा असावा, बारामती ते बंगलोर दैनंदिन वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते त्यादरम्यान विमान वेगाने गेल्यानंतर असा आवाज होतो असा तर्क आहे तर अनेकांच्या मते भूगर्भात लावारसाचा उतपात झाल्यानंतर असे गुढ आवाज होतात मात्र याबाबत अद्यापही ठोस उलगडा झालेला नाही दरम्यान सोमवारी सकाळी ९:५२ च्या सुमारास अचानक प्रचंड मोठा असा धुंडूब… असा गुढ आवाज होताच घरातील खिडक्यांची तावदाने हादरली , घरातील संसार उपयोगी साहित्य थरथरल्यामुळे खाली पडले , प्रचंड आवाजामुळे लोक घराच्या बाहेर पळाले पण नेमका कशाचा आवाज झाला याचा उलगडा झालेला नाही.

सांगोल्यात यापूर्वी अनेक वेळा प्रचंड गुढ आवाज झाल्याचे ऐकलं होते. परंतु आज प्रत्यक्ष गुढ आवाज स्वतः च्या कानांनी ऐकू आला. माझ्या चारचाकीतील सेंसर सुद्धा थरारला गुड आवाजाबाबत भूगर्भ ग्राउंड वॉटर सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सीला आजच कळविणार आहोत. त्यानंतरच नेमका गुण आवाज कशाचा होतोय याचा उलगडा होईल.

-संतोष कणसे तहसीलदार सांगोला

Related Articles

Back to top button