maharashtratop news

सर्वात मोठी बातमी , लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?, मंत्र्यांनी थेट सांगितलं…

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली महायुतीच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही अतिशय चर्चेत असून जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातीस महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरन 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीलाही विधानसभेत झाला. लाडक्या बहीणींनी भरभरून मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आली. मात्र आता आश्वासनाची पूर्तता कधी होणार, लाडक्या बहिणीांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेकींच्या मनात होतात. त्याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं. एकीकडे विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. तस विधानसभा निवडणुकीत जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता कधी होणार, 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याची राज्यातील महिलांना उत्सुकता होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केले असून त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

 

Related Articles

Back to top button