maharashtra
डॉ.मयुरा माळी यांना पी.एच.डी पदवी प्रदान

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन एल.एम.माळी यांची कन्या कुमारी मयुरा लक्ष्मण माळी यांनी नुकतीच ए स्टडी ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉईज विथ स्पेशल रेफरन्स टू टेक्सटाईल इंडस्ट्रीज इन सोलापूर डिस्ट्रिक्ट या विषयांमध्ये पीएचडी पदवी संपादन केली आहे
कुमारी मयुरा माळी यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथील आदर्श प्राथमिक विद्यालय, माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे, जुनिअर कॉलेजचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे तर बीसीएस पदवी सांगोला कॉलेजमधून संपादन केली. सिंहगड कॉलेज कमलापूर येथून एमसीएचे शिक्षण पूर्ण केले.
कुमारी मयुरा माळी यांना माजी प्राचार्य प्रा.डॉ.अनिल बारबोले यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी पदवी संपादन केले बद्दल डॉ.मयुरा माळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.