सांगोला फॅबटेक मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला :- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात १६ मे २०२५ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड यांनी दिली.

या मेळाव्याची सुरवात डीन अ‍कॅडमिक डाॅ. शरद पवार, डीन स्टुडंट डाॅ. संजय पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड, प्रा. सुकन्या बिराजदार, पालक प्रतिनिधी योगेश्वरी खंदारे, अरविंद पांढरे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरवात करण्यात आली. मेळाव्याच्या सुरवातीस पालक प्रतिनीधी यांचे पुष्पगुच्छ देऊन विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड यांनी विभागातील शैक्षणिक आलेख, शैक्षणिक गुणवत्ता याशिवाय विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा याविषयी महत्वपूर्ण माहिती पालकांना दिली.  याशिवाय डीन अ‍कॅडमिक डाॅ. शरद पवार, डीन स्टुडंट डाॅ. संजय पवार यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित केले.  या मेळाव्यात विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. पल्लवी बिले, प्रा. रूपाली बनसोडे, प्रा. विजय पाटील, प्रा. आशिष जोशी, प्रशांत गोडसे आदींसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याचे सुञसंचलन कुमारी अश्विनी गव्हाणे हिने केले तर उपस्थितांचे आभार प्रा. स्नेहा पवार यांनी मानले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon