जाणून घ्या हळदीचे फायदे आणि साईड इफेक्ट
हळद ही प्रत्येक घरातील स्वयंपाकघराचा मुख्य भाग आहे. तर हळदीचे सेवन केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तसेच आयुर्वेदात देखील हळदीला खूप महत्व आहे, कारण हळद ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने आपल्याला याचा शारीरिक दृष्ट्या खूप फायदा होतो. हळदीच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच हळदीचा वापर आपण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी करत असतो. यासोबतच हळद आपल्या आरोग्याला ही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. शिवाय शरीरातील जळजळ कमी करण्याचेही काम करते. साधारणपणे हळदीच्या फायद्यांविषयी तुम्ही ऐकलं असेलच. पण हळदीचे साइड इफेक्ट्स आहेत हे तुम्हाला माहित आहे का? तसे नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्सही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. चला जाणून घेऊया.
हळद ही अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. दररोज हळदीचे कमी प्रमाणात केले जाणारे सेवन फायदेशीर ठरू शकते, परंतु तुम्ही अधिक प्रमाणात हळदीचा रोजच्या आहारात जास्त प्रमाणात वापर केल्याने आरोग्याच्या काही समस्या देखील उद्भवू शकतात.
हळदीमुळे होणारे नुकसान
- रोजच्या जेवणात हळदीचे प्रमाण जास्त होत असेल तर याने तुमच्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अतिसार, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही जास्त प्रमाणात हळदीचे सेवन करत असाल तर त्यावर नियंत्रण ठेवा.
- हळद रक्त पातळ करण्याचे काम करते. जर तुम्ही आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर जास्त हळदीचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.
- प्रामुख्याने हळद ही गरम असते. यामुळे आहारात हळदीचे जास्त सेवन झाल्याने काही लोकांना एलर्जी देखील होऊ शकते ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि सूज येते अश्या समस्या निर्माण होतात.
- जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या देखील उद्भवू शकते. याशिवाय तुम्हाला डोकेदुखीलाही सामोरे जावे लागू शकते.
- जर तुम्ही यकृताच्या समस्येशी झगडत असाल तर हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण यामुळे तुमचा प्रॉब्लेम आणखी वाढू शकतो.
- गर्भवती महिलांनी देखील जास्त हळदीचे सेवन करू नये, कारण यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजन मिळू शकते.
- मधुमेहाच्या रुग्णांनी विचारपूर्वक हळदीचे सेवन करावे. कारण त्यांचे रक्त जाड असते. ते पातळ करण्यासाठी रुग्णांना औषधे घ्यावी लागतात. हळद रक्त पातळ करण्याचे ही काम करते. यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो.
हळदीचे फायदे
- शरीराला येणारी सूज आणि वेदना दूर करते
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
- त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते
- पचनक्रिया सुधारते
- हृदयाचे आरोग्य सुधारते
- कर्करोग प्रतिबंध करते
त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात हळदीचे योग्य प्रमाणात वापर केल्यास तुम्हाला कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. अश्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास व तंदुरुस्त रहाण्यास मदत मिळते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)