maharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
29 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार
- महायुतीची मुंबईतील आजची बैठक रद्द: CM पदाच्या मोबदल्यात शिवसेनेला हवे गृह व अर्थखाते; भाजपही याच खात्यांसाठी अडून
- खरगे म्हणाले- काँग्रेस संघटनेत बदलाची गरज: म्हणाले- EVM मुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद, महाराष्ट्राचा निकाल न्याय्य ठरवता येणार नाही
- चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही, उद्या निर्णय: ICC बोर्डाची बैठक पुढे ढकलली, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले- टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही
- सरकार कधी स्थापन होणार?: दीपक केसरकर म्हणाले – सध्या चांगला मुहूर्त नाही, 2 डिसेंबरनंतर चांगल्या मुहूर्तावर शपथविधी होईल
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वर्षा निवासस्थानी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड
- एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, आमदार शंभूराज देसाईंचं वक्तव्य
- राज्यात भाजपचं सरकार, त्यामुळं अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला
- वक्फ बोर्डाच्या निधीवरुन गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटींचा निधी जाहीर, मात्र नंतर जीआर मागे
- एका दिवसात 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे पुरावे द्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
- विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड; कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात
- हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, आमदार कैलास पाटलांची धाराशिवमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर धडक, म्हणाले,खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा
- संसदेचे कामकाज 2 डिसेंबरपर्यंत तहकूब: 4 दिवसांत एकूण 40 मिनिटे कामकाज झाले; अदानी व संभलवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले
- गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात: भरधाव बस भररस्त्यात उलटली; तब्बल 15 प्रवाशांचा मृत्यू, 20 ते 25 जण जखमी, काही गंभीर
- भाजपमध्ये एकही लाडकी बहीण CM पदाच्या योग्यतेची नाही का?: सुषमा अंधारे यांचा सवाल, म्हणाल्या – 5 डिसेंबरपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर
- अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर हल्लाबोल: म्हणाले – माझ्या नेतृत्वात 82 जागा आल्या होत्या, बाबांनी 82 च्या 42, पटोलेंनी 42 च्या 16 केल्या
- दिसायला सोज्वळ पण व्हाईट कॉलर गुंड असलेल्यांना मोडून काढणार; निवडून येताच मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल
- पुण्यातील रसिकांना प्रतीक्षा संपली! सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 18 डिसेंबरपासून रंगणार, कलाकारांची सादरीकरण ठरणार
- ‘पुष्पा-2’च्या प्रमोशनसाठी अल्लू-रश्मिका मुंबईत: ढोल-ताशांच्या गजरात चाहत्यांनी केले स्वागत; पुष्पा-श्रीवल्लीने स्टेजवर सामी गाण्यावर डान्स केला
- त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची त्सुनामी, एकाच षटकात 28 धावांचा पाऊस, 11.2 षटकांतच बडोद्यानं गाठलं 109 धावांचं लक्ष
- बॉर्डर म्हणाले- ऑस्ट्रेलियाने कोहलीला शतक झळकावण्याची संधी दिली: आता मालिका गमवावी लागेल; हेडन म्हणाला- शॉर्ट बॉल टाकला नाही
- 15 डिसेंबर रोजी बंगळुरूत WPL मिनी लिलाव: 5 संघांमध्ये 19 स्लॉट रिक्त, 16.7 कोटी रुपयांचे बजेट; गुजरातची सर्वात मोठी पर्स
- सौजन्य –
हॉटेल जयनिला,सांगोला
मो.8007812004