india worldmaharashtrapoliticalsolapurtop news

मोठी बातमी! शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर, पंढरपूरमध्येही उमेदवार उतरवला

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपली शेवटची यादी जाहीर

मुंबई

विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता राज्यातील सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपत आले आहे. आता शेवटच्या टप्प्यातील जागा जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) माढा, पंढरपूर, अशा महत्त्वाच्या जागांचा पेच होता. हा पेच आता सुटला आहे. येथे शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत पंढरपूर, माढा या मतदारसंघांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.

 

पाचव्या यादीत कोणत्या उमेदवाराला कुठून तिकीट?

माढा- अभिजीत पाटील

मुलुंड- संगिता वाजे

मोर्शी- गिरीश कराळे

पंढरपूर- अनिल सावंत

मोहोळ- राजू खरे

Related Articles

Back to top button