सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे बेकायदेशीर वास्तव्य उघडकीस आले असून, या घुसखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अॅड.सचिन देशमुख यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, या निवेदनात घुसखोरांच्या उपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले आहे.निवेदन देते प्रसंगी समाधान दिवसे, तानाजी टकले, विजय खरात आणि भूपेंद्र देशमुख उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी रोहिंग्यांचे अवैध वास्तव्य आढळून आले आहे. या रोहिंग्यांनी स्थानिक शेतकर्यांशी विश्वास संपादन करून, त्यांच्याकडील डाळिंब व द्राक्षे मोठ्या प्रमाणात खरेदी करून, त्यांना सुरुवातीला काही रक्कम रोख देऊन, नंतर अचानकपणे मोठ्या प्रमाणात मालासह गायब होण्याचे प्रकार घडवले आहेत.
या रोहिंग्यांनी स्थानिक लोकांच्या आडून देशविघातक कारवाया सुरु केल्या आहेत. ते बनावट आधारकार्ड आणि ओळखपत्रे वापरून बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत, तसेच, स्थानिक तरुणांना पैशाचे आमिष दाखवून बोगस आधारकार्ड काढून देण्याचे रॅकेट चालवत आहेत.यामुळे सांगोला तालुक्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या रोहिंग्यांच्या अवैध वास्तव्यामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, तसेच, देशाच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.या रोहिंग्यांच्या अवैध वास्तव्याबाबत खालील बाबींवर तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे:
सांगोला तालुक्यातील आधार केंद्रांमध्ये बोगस आधारकार्ड बनवण्याचे रॅकेट चालवणारे युवक आणि रोहिंग्या यांच्यावर तात्काळ कारवाई करावी,या रोहिंग्यांच्या अवैध वास्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
सांगोला तालुक्यातील खेड्यापाड्यात तसेच सांगोला शहरातील चिंचोली रोडवरील असणार्या गाळ्यांमध्ये व रोड नजीक असणार्या घरांमध्ये वास्तव्यास असणार्या रोहिंग्यांचा कसून तपास करावा. सांगोला तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात.या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी.असे आवाहन अँड.सचिन देशमुख यांनी केले आहे.
IML 2025 : इंडिया मास्टर्सची फायनलमध्ये एन्ट्री, ऑस्ट्रेलियावर 94 धावांनी धमाकेदार विजय
काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे, अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, म्हणाले