सकल मराठा समाज सांगोला तालुक्याच्या वतीने रविवार दिनांक 9 मार्च रोजी सांगोला बंद व रस्ता रोकोची हाक
सांगोला (प्रतिनिधी):-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाज सांगोला तालुक्याच्या वतीने रविवार दिनांक 9 मार्च रोजी सांगोला बंद व रस्ता रोकोची हाक देण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना काल बुधवार दिनांक 5 मार्च रोजी देण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या समाजविघातक व दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक 9 मार्च रोजी सांगोला बंद व विविध ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी सकल मराठा समाज सांगोला तालुका चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा
SA vs NZ Semi Final : उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, कोण जिंकणार?