टीम इंडियाने काढला वर्ल्डकपचा वचपा; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

India Vs Australia: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करत वर्ल्डकपचा वचपा घेतलाय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमघ्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला.

India Vs Australia: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करत वर्ल्डकपचा वचपा घेतलाय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमघ्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे खेळवण्यात आला. हा सामना 4 विकेट्सने जिंकून भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. गोलंदाजांपासून ते फलंदाजांपर्यंत सर्वांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत २६४ धावांवर ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्याशिवाय, ट्रॅव्हिस हेड 33 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. तर अ‍ॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावांची खेळी केली. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

भारत – ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात भारताच्या फलंदाजीची 35 वी ओव्हर सुरु असताना भारताचा स्टार फलंदाज अक्षर पटेलची विकेट पडली. अक्षर पटेलच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला, यापूर्वी रोहित, गिल आणि श्रेयस अय्यर यांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. अक्षर पटेलने 30 बॉलमध्ये 27 धावा केल्या. किंग कोहली म्हणजे विराट कोहलीने 98 बॉलमध्ये 84 रन्स केले. या सामन्यात भारताचा गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुइसची विकेट घेतली आणि सातव्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये धाडले. बेन द्वारशुइसने 29 बॉलमध्ये 19 धावा केल्या होत्या. अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने 5 बॉलवर 7 धावा केल्या होत्या मात्र 37.3 ओव्हरला अक्षरने अचूक मारा करून त्याचे स्टंप उडवले. श्रेयस अय्यरने ॲलेक्स कॅरी आणि ॲडम झाम्पाहे दोन धावा घेण्यासाठी धाव घेत असताना श्रेयस अय्यरने स्टंपवर अचूक मारा करून ॲलेक्स कॅरीला रन आउट केलं आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon