solapur
नातेपुतेमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा राडा
सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये गौतमी पाटीलच्या
कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती की बसायला जागा नव्हती. त्यामुळे तरुणांनी कार्यक्रमात राडा घातला. तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले. परिणामी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. नातेपुते गावात गौतमीच्या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांनी प्रचंड गर्दी केली.
या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त झाल्यामुळे बसायला जागाच उरली नसल्यामुळे तरुणांनी खुर्च्या फेकल्या आणि जागा मिळेल तिथे उभे राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. त्यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा डान्स सुरू असतानाच हा गोंधळ सुरू झाला.