क्राईम
शिजान खानने डिलीट केलेले ‘ते’ मेसेज पोलिसांनी केले रिकव्हर

अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार-बॉयफ्रेंड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. तुनिषाच्या आईने शिजानवर अनेक आरोप केले आहेत. पोलीस देखील त्याची कसून चौकशी करत आहेत.
या प्रकरणाच्या तपासांत पोलिसांनी तुनिषा आणि शिजान दोघांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. यातून आता शिजानने डिलीट केलेले मेसेज पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. शिजान हा ब्रेकअप झाल्यापासून तुनिषाला सतत दुर्लक्षित करत होता.
इतकेच नाही तर, तुनिषाचे मेसेज पाहून देखील शिजान तिला रिप्लाय देत नव्हता. त्याचवेळी तो इतर मुलींसोबत चॅटींग देखील करत होता. रिकव्हर झालेल्या मेसेजमधून हा मोठा खुलासा झाला आहे. शिजान एकाच वेळी अनेक तरुणींच्या संपर्कात होता.
शिजानने त्याच्या फोनमधून डिलीट केलेले सगळे मेसेज पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. या मेसेजेसमधून असे लक्षात आले आहे की, शिजान तुनिषाकडे दुर्लक्ष करून इतर तरुणींसोबत गप्पा मारत होता. तुनिषा त्याला अनेक मेसेज करून देखील तो तिला रिप्लाय देत नव्हता. त्याच्या फोनमधून अनेक महत्त्वाचे खुलासे झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.