sports
भारत-श्रीलंका मालिका तीन जानेवारीपासून
बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताला आता नव्या वर्षात घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करायचा आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहेत.
ही मालिका ३ जानेवारीपासून सुरू होत असून त्यासाठी ब्रॉडकास्टर्सनीही तयारी पूर्ण केली आहे. भारत-श्रीलंका सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आधी ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा टी-20 सामना ५ जानेवारीला पुण्यात खेळवला जाणार आहे. तसेच, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये होईल.
त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्या वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला गुवाहटीमध्ये होणार आहे. दुसरा वनडे १२ जानेवारीला कोलकात्यात आणि शेवटचा वनडे १५ जानेवारी तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.